---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा

अवैध उत्खनन प्रकरणी वनविभागाची कारवाई; जेसीबी जप्त करत गुन्हा दाखल!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२४ । वनहद्दीत अवैधपणे मुरूम उत्खनन करीत असलेल्या जेसीबी जप्त करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची घटना वडोदा वनक्षेत्रात वनविभागाच्या पथकाने केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

utkhanan jpg webp

याबाबत वनसुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील उचंदे येथील वनकक्ष क्र. 590क मध्ये जेसीबी मशीन चर्या साहाय्याने मुरुम उत्खननाचे काम सुरु असल्याची गुप्त माहीती वनविभागाला मिळाली होती. या माहीतीच्या आधारे जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रविण साहेब तसेच साहाय्यक उपवनसरंक्षक उमेश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी पारीमल साळुंखे यांच्या सह वनपाल गणेश गवळी,वनरक्षक गोसावी, डि एस पवार,असुरे,कोळी,मोरे यांच्या पथकाने कारवाई केली.

---Advertisement---

दि. 18 रोजी रात्री अकराच्या सुमारास सदर कारवाई करण्यात आली. दरम्यान घटनास्थळी पथकाने धाव घेताच जेसीबी मशीन पळवून नेण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता परंतु उचंदा येथील स्मशानभुमीजवळ जेसीबी मशीन क्रं. एम एच 19 सी झेड 4613 ताब्यात घेण्यात पथकाला यश आले. याप्रकरणी भा.दं.वि.वनगुन्हा 1927 अंतर्गत मशीन ऑपरेटर स्वप्निल कोळी व मशीन मालक नारायण इंगळे या दोघांवर वनविभागाच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी पारीमल साळुंखे करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---