जळगाव जिल्हा

‘दाना’ चक्रीवादळामुळे भुसावळ मार्गे धावणाऱ्या ५ रेल्वे गाड्या रद्द

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२४ । ओडिशामधील पूर्वतटीय रेल्वे ‘दाना’ चक्रीवादळामुळे प्रभावित झाली आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या पाच प्रवासी गाड्यादेखील रद्द केल्या आहेत. परिणामी प्रवाशांची गैरसोय होऊन त्यांना अन्य गाड्यांचा पर्याय शोधावा लागणार आहे.

दाना वादळामुळे रद्द केलेल्या रेल्वे गाड्यांमध्ये २२९७३ ही गांधीधाम पुरी एक्सप्रेस २३ ऑक्टोबरला गांधीधाम येथून सुटणार नाही. ही गाडी रद्द केली आहे. तर २२८६५ लोकमान्य टिळक टर्मिनस – पुरी एक्सप्रेस २४ ऑक्टोबरला एलटीटी येथून सुटणार नाही. २०८२४ पुरी अजमेर एक्स्प्रेस २९ ऑक्टोबरला पुरी येथून सुटणार नाही. २६ ऑक्टोबरला पुरी येथून सुटणारी २२९७४ पुरी गांधीधाम एक्सप्रेस रद्द केली आहे.

०९०६० ब्रह्मपूर उधना विशेष एक्स्प्रेस २५ ऑक्टोबरला ब्रह्मपूर येथून सुटणार नाही. प्रवाशांनी हा बदल पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, दिवाळी तोंडावर असल्याने भुसावळ विभागातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. त्यात आता पाच गाड्या वेगवेगळ्या दिवशी रद्द झाल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत भर पडेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button