जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२१ । शहरातील खंडेराव नगर येथून भाजीपाला खरेदी करून जात असलेल्या सायकलस्वाराला भरधाव वाळू ट्रॅक्टरने धडक दिल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने लागलीच पळ काढला.
पिंप्राळा हुडकोजवळील आझाद नगर परिसरात राहणारे मेहबूब खान पठाण वय-५० हे गुरुवारी सायकलने भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. भाजीपाला खरेदी करून ते घरी परतत असताना आझाद नगरजवळ भरधाव ट्रॅक्टरने त्यांना धडक दिली.
अपघातात मेहबूब खान यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पोलीस ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहे. मेहबूब खान यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, २ मुली असा परिवार आहे.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/979345826140629/