Bhusawal NEws-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील प्रौढाला क्रेडीट कार्ड ब्लॉक करण्याच्या भामट्या महिलेने सव्वा लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार अनिल प्रभाकर वंजारी (52, वंजारी वाडा, वरणगाव) यांना गुरुवार, 13 रोजी रात्री 9.16 वाजता 9423192419 व 911243983721 क्रमांकावरून आलेल्या कॉलवरील महिलेने एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगत हरवलेले क्रेडीट कार्ड ब्लॉक करून देते म्हणत विश्वास संपादन करून ओटीपी क्रमांक मिळवून एक लाख 16 हजार 421 रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी वंजारी यांनी गुरुवारी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.