⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयाच्या औषध वितरण कक्षात जाऊन आरोग्य कर्मचारी महिलेच्या अंगावर धावून जात अश्लील शिवीगाळ करून आरडाओरड करत सुरक्षा रक्षकाला दमबाजी करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाच्या विरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती अशी की मेहुणबारे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मंदार करंबळेकर यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मेहुणबारे गावात राहणारा विजय देशमुख हा त्रास देण्याच्या उद्देशाने नेहमी अर्ज फाटे करीत असतो. त्याने कार्यकर्त्यांमार्फत यापूर्वीही महिला वैद्यकीय अधीक्षक यांच्या वर हल्ला केला होता. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी 11.5 वाजता आपण कार्यालयात बसलो असताना बाहेर ओरडण्याचा आवाज आला तर बाहेर जाऊन पाहिले असता विजय देशमुख मोठ्यामोठ्याने आरडाओरड करत होता. औषध वाटप करणाऱ्या महिला कर्मचार्‍याच्या दालनात जाऊन त्यांच्या अंगावर धावून गेला. व मला ओळखले का तुम्हाला एकेकाला कामाला लावून टाकेल. असे सांगत शिवीगाळ केली. आणि गोंधळ घातला.

याप्रकरणी डॉक्टर मंदार करंबळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस स्थानकात संशयित आरोपी विरुद्ध भादंवि कलम 294, 447, 352, 186, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू आहे.