⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

रोटरी सर्कलवर नामफलक आंदोलन, विरोधी पक्षनेत्यांसह ४० जणांवर गुन्हा

जळगाव लाईव्ह न्यूज । २० जानेवारी २०२२ । शहरात नव्याने उभारण्यात येत असलेल्या चाैकातील राेटरी सर्कलवर मीर शुक्रुल्ला व सरदार वल्लभभाई पटेल या दाेघांच्या नावाचे फलक लावण्यासाठी दोन गटांनी विनापरवानगी आंदोलन केले. जमावबंदी ओदशाचे उल्लंघन केले. कोराना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने घालून दिलेले निर्बंध मोडले. त्यामुळे पोलिसांनी स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही गटांवर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले. दोन्ही गटांच्या ४० जणांवर दंगलीसह साथरोग अधिनियम कायद्याचे उल्लंघन केल्याचे कलम लावण्यात आले आहेत.

पोलीस कर्मचारी विश्वास बोरसे यांच्या फिर्यादीवरून नाजीम मीर, सय्यद दानिश शकील अहमद, शेख अहमद हुसेन, इम्रान हुसेन, मोहंमद इम्रान अब्दुल गनी शेख, रेयान जहागीरदार, शेख शाकीर शेख अजिज, आसिफ शेख फारुख बादलीवाला व २० जणांवर गुन्हा दाखल झाला. तर पोलिस कर्मचारी मंदार पाटील यांच्या फिर्यादीवरून विष्णू भंगाळे, सुनील सुपडू महाजन, ललित कोल्हे, ललित चौधरी, आशुतोष चुडामण पाटील, मुकुंदा कोळी यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख व नीलेश गोसावी तपास करीत आहे.

हे देखील वाचा :