मेहुणीला सोडायला आलेल्या इसमावर काळाचा घाला, दोन बसमध्ये दबून मृत्यू!

ऑक्टोबर 14, 2022 3:16 PM

Jalgaon news-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । शहरातील नवीन बसस्थानकात दोन बसमध्ये दाबले जाऊन जखमी झालेल्या गृहस्थाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना बुधवारी १२ ऑक्‍टोंबर रोजी घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

jalgaon 2022 10 14T151606.157 jpg webp

पंडित लोटू सोनवणे (वय ५०) मयत व्यक्तीचे नाव आहे. सोनवणे हे खेडी-कढोली येथे पत्नी, मुलगा व कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी भारती यांची प्रकृती खराब झाल्याने त्यांना ११ ऑक्‍टोंबरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. भारती यांची बहीण त्यांना रुग्णालयात पाहण्यासाठी आल्या होत्या. मेहुणीला बसमध्ये बसवून देण्यासाठी पंडित सोनवणे नवीन बसस्थानकावर गेले.

दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास मेहुणीला बसमध्ये बसविल्यानंतर पायी जात असताना ते मागून आलेल्या बस (एमएच २०, बीएल २४२१) आणि (एमएच ४०, एन ९१०६) या दोन बसमध्ये दाबले गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा जिल्हापेठ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now