डोलारखेड्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार

ऑक्टोबर 14, 2022 12:25 PM

muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील वडोदा वनक्षेत्र तथा प्रस्तावित अभयारण्यातील मुक्ताईनगर-कुऱ्हा/वढोदा रस्त्यावरील डोलारखेडा गावाजवळ १२ रोजीच्या मध्यरात्री रस्ता ओलांडत पलीकडे जाणाऱ्या चितळ जातीच्या हरीणाला अज्ञात वाहनाच्या धडकेत जीव गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली.

jalgaon 2022 10 14T122457.092 jpg webp

घटनेचे वृत्त कळताच वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांनी मार्गदर्शक सूचना करुन वनपाल डि जी पाचपांडे,वनरक्षक बापु थोरात,जी बी गोसावी,वनमजुर अशोक पाटील, सिद्धार्थ थाटे, संजय सांगळकर यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनाम्यासह इतर सोपस्कार पार पाडत मृत हरीणाचा अंत्यवीधी केला. सदर क्षेत्रात वन्यप्राणी यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.वनक्षेत्रार्तगत रस्ता असल्याने वन्यप्राण्यांना रस्ता ओलांडून पलीकडे ये-जा करतांना जीव गमवावा लागत आहे.सदर रस्ता डोलारखेडा फाटा ते चिंचखेडा बु पर्यतच्या रस्त्यावरुन वाहनधारकांनी वेगमर्यादित ठेवुन काळजीपुर्वक वाहने चालवावी असे आवाहन वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now