जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२२ । मागील काही सत्रात सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली होती. मात्र आज आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी भारतीय वायदा बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोबतच चांदी देखील महागली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या भावात किंचित 57 रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदीचं भावात 30 रुपयाची वाढ झाली आहे. Gold Silver Price Today

MCX वर आजचा सोने चांदीचा भाव?
आज गुरुवारी, MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 10.30वाजता 57 रुपयांनी वाढून 50,962 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचवेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्येचांदीच्या किमतीत 30 रुपयांची वाढ झाली असून त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा भाव घसरण झाली आहे. त्यामुळे चांदीचा एक किलोचा भाव 57,355 रुपयावर व्यवहार करत आहे.

दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,720 रुपये इतका आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,000 रुपये इतका आहे. तर दुसरीकडे सध्या चांदीचा भाव 58,500 रुपयापर्यंत आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.












