VIDEO : नाशिकनंतर आता पुण्यातही बर्निंग बसचा थरार ; 27 प्रवासी करत होते प्रवास

ऑक्टोबर 12, 2022 11:27 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२२ । गेल्या काही दिवसापूर्वीच नाशिकमधील बस दुर्घटनेत ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना आणखी एक थरकाप उडवणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. भीमाशंकर कडे जाणाऱ्या खाजगी बसने अचानक पेट घेतला आहे. ही धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शिंदेवाडी गावाजवळ घडली आहे. बसमध्ये २७ प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या घटनेमध्ये कोणताही जीवितहानी झाली नाही.

bus accident pune jpg webp

MH 05 DK 9699 क्रमांकांची ही बस होती. आग लागलेली खासगी बस ही भीमाशंकर इथं जाणारी होती. एका खासगी कंपनीची ही बस असून कंपनीचं नाव कळू शकलेलं नाही. पुणे जिल्ह्यातील घोडेगाव शिंदेवाडी गावाजवळ या बसने पेट घेतला. या बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप असल्याची माहिती समोर आलीय.

कशामुळे आग लागली?
थोडक्यात जीव वाचल्याने या बसमधील प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडलाय. दरम्यान, या बसमध्ये नेमकी आग कशामुळे लागली, हे कळू शकलेलं नाही. शॉर्ट सर्टिकमुळे या बसने पेट घेतला असावा, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. बसमध्ये लागलेल्या आगीने प्रचंड नुकसान झालंय. बसमधील सीट, काचा आणि आतील बाजूचा पूर्णपणे कोळसा झाल्याचं दिसून आलंय.

बसला लागलेल्या आगीचा व्हिडीओ tv९ या मराठी वृत्तवाहिनीवर प्रकाशित झाला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून बसला आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बस ट्रॅव्हल आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होता की यात बसने पेट घेतला होता. यामध्ये अनेक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेने बसच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

पाहा व्हिडीओ :

https://twitter.com/ssidsawant/status/1580047328257671168

बसमध्ये आग लागतेय हे पाहून प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आलं. बस रस्त्याच्या एका कडेला उभी करण्यात आली. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळलाय.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now