जळगावातील एकाला महिलेसोबत ‘न्यूड व्हिडिओ कॉलिंग’ करणं महागात पडलं

ऑक्टोबर 11, 2022 12:42 PM

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । शहरातील एका ४० वर्षीय व्यक्तीला फेसबुकवर आलेली महिलेची रिक्वेस्ट स्वीकारणं चांगलंच भोवलं आहे. अनोळखी महिलेने न्यूड कॉल व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल २ लाखांची मागणी केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीसात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 2022 06 10T111019.145 jpg webp

सविस्तर असे की, शहरातील एका ४० वर्षीय पुरुषाला दि. ८ रोजी फेसबुकवर एका मुलीच्या नावाने रिक्वेस्ट आली. संबंधित व्यक्तीने ती रिक्वेस्ट स्वीकारली. यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाले. यानंतर संबंधित महिलेने त्या व्यक्तीचा व्हाटसअप नंबर घेतला व त्या पुरुषाला एकांतात येवून कपडे काढायला सांगितले. त्या महिलेने व्हिडीओ कॉल करीत तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून घेतला.

यानंतर त्या ४० वर्षीय पुरुषाला २ लाख रुपये मागितले. तसेच पैसे न दिल्यास तूझा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करेल अशी धमकी देत २ लाखांची मागणी केली. या प्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने जळगाव शहरातील सायबर पोलीसात धाव घेत संबधित तरुणीच्या नावाने बनविलेले खाते धारकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास लीलाधर कानडे हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now