खुशखबर.. व्यवहाराच्या सुरुवातीलाच चांदी 1400 तर सोने 500 रुपयांहुन अधिकने घसरले

ऑक्टोबर 10, 2022 10:48 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । दसरानंतर आता दिवाळी सण काही दिवसावर आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली. मात्र आज सोमवार, 10 ऑक्टोबर रोजी जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून येत आहे. आंतरराष्‍ट्रीय बाजारात सोन्यापेक्षा चांदीची किंमत अधिक घसरली आहे. आज सोने 500 रुपयांपेक्षा तर चांदी तब्बल 1400 रुपयांहून अधिकने घसरले आहे. त्यामुळे आज तुम्ही जर सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. Gold Silver Price Today

gold silver rate jpg webp

MCX वर आजचा सोने चांदीचा भाव?
आज सोमवारी, MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव सकाळी 10.30 वाजता 565 रुपयांनी घसरून 51,395 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. सोन्याचा भाव आज 51,685 रुपयांवर उघडला गेला. उघडल्यानंतर, किंमत एकदा 51,540 रुपये होती. थोड्या वेळाने घसरण होऊन 51,395रुपयांवर पोहोचला. त्याचवेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर तब्बल 1479 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे सकाळी चांदीचा दर 59,306 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आज चांदीचा व्यवहार 60,000 पासून सुरू झाला. एकदा किंमत 59,501 रुपये झाली. पण, काही काळानंतर त्यात थोडी सुधारणा झाली आणि किंमत 59,306 रुपयांवर व्यवहार सुरू झाली.

जळगाव सुवर्णनगरीतही सोने चांदी वधारली?
जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली दिसून आली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात जवळपास 1 हजार रुपयांहून अधिकने वाढ दिसून आली. तर दुसरीकडे चांदी जवळपास 4 हजार रुपयांहून अधिकने वाढ दिसून आली. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 52,000 रुपये इतका आहे. दुसरीकडे सध्या चांदीचा प्रति किलोचा भाव जवळपास 61,000 हजार रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now