⁠ 
शुक्रवार, जानेवारी 10, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | पर्यावरणपुरक शेती प्रक्रिया उद्योगातून महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न – डॉ. भारती चव्हाण

पर्यावरणपुरक शेती प्रक्रिया उद्योगातून महिला सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न – डॉ. भारती चव्हाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑक्टोबर २०२२ । केंद्र शासनाच्या सहकार्याने पर्यावरण पुरक बांबू लागवड, प्रशिक्षण, आणि स्वयम रोजगारच्या माध्यमातून जळगाव सारख्या जिल्हातील कुषी प्रधान जिल्ह्यातील महिलाना स्वयम रोजगार उपलब्ध करून आर्थीक सक्षमतेकडे नेण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन मानिनी फौंडेशनच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी केले.

श्री मंगल ग्रह् सेवा संस्थांन, ॳमळनेर येथील सभाॻहात मानिनी फौडेशन, जळगाव, यांचे वतीने ‘मानिनी संवाद’ कार्यक्रमात आयोजित करण्यात आला होता, यावेळी त्या बोलत होत्या. तसेच देशातील कुषी क्षेत्रा मध्ये
सुमारे ८० टक्के महिलांचा सहभाग असतानाही शेतकरी महिलांचे संघटन,प्रशिक्षण, शेती प्रक्रिया उद्योगातील सहभाग आणि अर्थ व्यवस्थेतील पकड़ किवां विपणन व्यवस्थेतील निर्णय क्षमतेचा अभाव आणि शेती अर्थ व्यवस्थेतील सहभाग या गोष्टीचा अभाव जाणवतो, किंबहुना महिला सक्षमीकरण व सबलीकरणासाठी शेती व शेती प्रक्रिया उद्योग यावर लक्ष केन्द्रित करणे आवश्यक आहे. राज्यशासन व केंद्र शासनाच्या शेती पुरस्कार् योजनाच्या आणि धोरणाच्या आधारे स्वयम रोजगार निर्मिती करणे शक्य आहे.

जळगाव जिल्ह्यातील जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि महिलांची शेती विषयक पारंपरीक् आवड आणि अनुभव लक्षात घेता मानिनी फौंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण पुरक शेती म्हणून् बांबू लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात् येत आहे, यामधे विशिष्ट प्रकारच्या जातीच्या बांबू च्या रोपांची उपलब्धता करुन देणे, लागवडीविषयक प्रशिक्षण देणे,लागवडीसाठी शासनाच्या अंतरगत आर्थीक मदत मिळवुन देणे, तयार झालेल्या बांबू च्या खरेदीची हमी देणे, बांबू पासुन् तयार होणाऱ्या उत्पादनाचे प्रशिक्षण देणे आणि हाताने व मशीनचे माध्यमातून विविध वस्तू तयार करूंन महिलाना रोजगार निर्मिती देणे आणि त्यांची विविध प्रकारे मार्केटिंगची व्यवस्था करणे याकामी फौंडेशनच्या च्या माध्यमातून सहकार्य करणार असल्याचेही डॉ. भारती चव्हाण यांनी सांगितले.

सदर् उपक्रमासाठी आणि महिलांचे विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी श्री मंगल ग्रह् संस्थाचे सचीव बाविस्कर यांनी जाहीर केले, बांबू प्रशिक्षण आणि कार्य शाळेबाबतची माहिती खानदेश बापू फारमा,लि,चे उमेश सोनार आणि श्री संदिप माळी यांनी उपस्थित महिलाना दिली. मेळाव्यास सुमारे ५०० मानिनी फौंडेशनच्या च्या महिला शेतकरी उपस्थित होत्या. सदर् मेळाव्यास मानिनी फौंडेशनच्या च्या राज्य पदाधिकारी आणि कौटुंबिक न्यायालयातील ज्येष्ठ कायदे तज्ञ,पुनम तांबट, कुषीभुषण सतीश काटे, संस्थानचे दिलीप बेहरम, शरद कुलकर्णी, महेश पाटील,डॉ. दिनेश पाटिल, संजय पाटील, अतुल पाटील, तसेच फौंडेशनच्या जळगावच्या अध्यक्षा जयश्री इंगळे,कार्याध्यक्ष भारती पाटील, छाया पाटील, कल्पना पाटील, आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्र संचालन महेश पाटील, प्रस्ताविक अतुल पाटील आणि आभार प्रदर्शन Dr. दिनेश पाटील यांनी केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह