बापरे! वरणगावातील विधवा महिलेचा विनयभंग करून केली दमदाटी

ऑक्टोबर 7, 2022 7:43 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ ऑक्टोबर २०२२ । भुसावळ तालुक्यातील वरणगाव परीसरातील 35 वर्षीय विधवा महिलेचा रस्ता अडवत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली घडली. या प्रकरणी एकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon 2022 10 07T194301.567 jpg webp

युवराज गणपत पवार असे संशयीत आरोपीचे नाव आहे. वरणगावतील परीसरातील एका गावातील 35 वर्षीय विधवा महिला गुरुवार, 6 रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास खालच्या गावातून किराणा सामान घेत घरी येत असताना आरोपी पवार याने महिलेसोबत अश्लील संवाद साधला. पीडीत महिलेने विरोध केला असता तिच्या घरी जात संशयीत आरोपीने पीडीतेला शिवीगाळ करीत मारहाण करीत मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. पीडीतेने वरणगाव पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर गुरुवारी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now