जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२२ । सणासुदीच्या मागणीचा परिणाम देशांतर्गत बाजारात दिसू लागला आहे. सोन्याच्या दरात आज गुरुवार, 6 ऑक्टोबर रोजी वाढ झाली आहे. सोबतच चांदीचा भाव देखील वधारला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.57 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव 52 हजाराच्या उंबरवठयावर आला आहे. तसेच आज वायदे बाजारात चांदीचा भाव तब्बल 1.36 टक्क्यांनी उसळी घेतली आहे. त्यामुळे चांदीचा भाव देखील 61 हजारांवर गेला आहे. Gold Silver Price Today

काय आहे MCX वर आजचा सोन्याचा भाव?
MCX वर आज गुरुवारी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 कॅरेट सोने 294 रुपयांनी वाढून 51,940 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव जवळपास 50,100 पर्यंत होता. मात्र त्यात मंगळवारी चांगलीच वाढ दिसून आली. तीन दिवसात सोने जवळपास 1800 ते 1850 रुपयांनी महागले असल्याचे दिसून येतेय.

काय आहे MCX वर आजचा चांदीचा भाव?
दरम्यान, दुसरीकडे आज मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात चांगलीच उसळी आली आहे. आज सकाळच्या सत्रात चांदी प्रति किलो तब्बल 866 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर 61,633 रुपयावर व्यवहार करत आहे. दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांदीचा भाव 57,500 रुपयापर्यंत होता. मात्र गेल्या दोन ते तीन दिवसात चांदी जवळपास 4100 ते 4200 रुपयांनी वधारला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात आज मंदी
गेल्या आठवडाभरापासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या भावात झालेली वाढ आज संपुष्टात आली. सोन्याची स्पॉट किंमत आज 0.22 टक्क्यांनी वाढून $1,719.53 प्रति औंस झाली आहे. सोन्याबरोबरच आज चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीची स्पॉट किंमत आज 1.14 टक्क्यांनी घसरून 20.78 डॉलर प्रति औंस झाली आहे.
जळगाव सुवर्णनगरीतही सोने चांदी वधारली?
दसऱ्याच्या मुहूर्तावर जळगाव सुवर्णनगरीतही सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झालेली दिसून आली. सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 52,000 हजाराच्या पुढे आहे. सोन्याचा हा दर सोमवारी जवळपास 51,300 ते 51,400 रुपयापर्यंत होते. सध्या चांदीचा प्रति किलोचा भाव 62,000 हजारावर आहे. तसेच सोमवारी चांदीचा दर जवळपास 57,500 इतका होता. मात्र त्यात गेल्या दोन ते तीन दिवसात तब्बल 4000 ते 4500 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.
किंमती वाढू शकतात
भारतात सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण भारताला सोन्याचा पुरवठा करणाऱ्या विदेशी बँकांनी पुरवठा कमी केला आहे.












