समोरच्यांकडे 50 खोके आमच्याकडे उद्धव ठाकरे – अंबादास दानवे

ऑक्टोबर 5, 2022 7:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । समोरचे लोक म्हणतात आमच्याकडे 50 खोके, 50 आमदार, गुवहाटी, सुरत आहे. पण मी सांगीन माझ्याकडे उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्या बळावर शिवसेना तुम्हाला निस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

ambadas danve uddahv thakre jpg webp

यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात शेतकऱ्याला रडायला लावणारे सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आणि आमदारांच्या अंगात सत्तेची मस्ती आली आहे. मात्र गेल्या 70 ते 80 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात पावणे चारशेच्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

उद्धव ठाकरे LIVE :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/1177587559769900/

शिवसेना सर्वसामान्यांची आहे. याचं मी एक उदाहरण आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यातल्या 18 जिल्ह्यात फिरून आलो. रोज अनेक वल्गना केल्या जातात. पण जनते प्रती सरकारची संवेदनशीलता हरवली आहे.असेही दानवे म्हणाले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now