जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२२ । गुलाबराव पाटील साहेब, उद्धव साहेबांना फोन लावून सांगा खरी शिवसेना ही बीकेसी वर आहे. असा टोला आमदार शहाजी बापू पाटील यांनी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाला लगावला.

यावेळी शहाजी पाटील म्हणाले की, बाळासाहेबांचे पुत्र आहेत यामुळे आम्ही तुमचा अजूनही सन्मान करतो. तुमचा मान ठेवतो. मात्र ज्या प्रकारे बाळासाहेबांचे विचार मोडत तुम्ही आमदारांना फरफटत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत घेऊन गेलात हे अतिशय चुकीचं होतं. यासाठीच आम्ही उठाव केला आहे. तुम्ही आम्हाला गद्दार म्हणता मात्र आम्ही खुद्दार आहोत.

एकनाथ शिंदें LIVE :
बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना मैद्याचे पोते म्हणाले. अशा शरद पवारांसोबत तुम्ही युती केलीत. आम्हा आमदारांना फरफटत तुमच्या मागे घेऊन गेलात. यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णय योग्यच आहे. आणि तो निर्णय योग्य आहे.. असं आज बीकेसीची सभा सांगते आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना मिळत असलेले प्रेम हे सुद्धा हेच सांगत आहे. अशा शब्दात शहाजी बापू पाटील यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतलं.












