जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा प्र.चा. ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभारामूळे अनेक वर्षापासून गावातील विकास कामे रखडलेले आहे. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाने व गटविकास अधिकारी यांनी स्वताः याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र मध्ये लिम्पी आजार सुरु आहेत. मात्र, येथे घाणीचे सामराज्य पसरले असून डेंग्यू सारखे आजाराचे ग्रामपंचायत स्वताः स्वागत करत आहे.
गावातील नागरिकांनी अनेक वेळी सरपंच यांना गटारी रोड बनवण्यासाठी विनंती केली. मात्र, सरपंच हे केवळ नागरिकांना घरपट्टी व पाणि पट्टी भरण्याची धमकी देत आहे. गावातील नागरिक ग्राम पंचायतीची थकबाकी भरण्यास सक्षम व तयार आहेत. परंतु, ग्राम पंचायतमध्ये विकास कामासाठी जो निधी शासनाकडून येतो, तो जातो कुठे? गावात विकास फक्त नावावर आहे काम कुठे आहे? विकास फक्त कागदावर आहे का ? असे प्रश्न नागरिक करत आहेत.
इंद्रानगर प्लाँट येथे जिल्हा परिषदेची शाळा असून पुलावरून पाणी वाहत असताना शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या जिवाला धोका आहे. काही महिन्यापुर्वी एका व्यक्तीने पुलावरून पाणी वाहत असता पुल ओलांडताना पाण्यात वाहून आपले प्राण गमावला आहे. त्यामुळे गावातील समस्यावर शासनाने ताबडतोब लक्ष द्यावे व गावातील विकास कामाची निधी कोणाच्या खिशात जात आहे . याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहेत.