ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी गुडन्यूज ; FD वरील व्याजदर वाढले, आता मिळणार ‘इतके’ व्याज

ऑक्टोबर 2, 2022 11:02 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२२ । आरबीआयने दोन दिवसापूर्वी म्हणजेच शुक्रवारी रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्याची घोषणा केली. यानंतर रेपो दर 5.40 टक्क्यांवरून 5.90 टक्के झाला. या वाढीनंतर बहुतांश बँकांनी एफडीचे व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. ICICI बँकेने मुदत ठेवींवर (FD) व्याजदरही वाढवले ​​आहेत. आता या बँकेच्या ग्राहकांना एफडीवर अधिक व्याज मिळणार आहे. याशिवाय, बँकेने 30 सप्टेंबर रोजी ‘गोल्डन इयर्स एफडी’ योजना देखील सुरू केली आहे.

ICICI Bank

बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता तुम्हाला ICICI बँकेत FD केल्यास 3.00% ते 6.10% पर्यंत व्याज मिळेल. ICICI बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, नवीन व्याजदर 30 सप्टेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.

जाणून घ्या आता FD वर किती व्याज मिळत आहे

7 ते 29 दिवस – 3.00
30 ते 90 दिवस – 3.50
91 ते 184 दिवस – 4.25
185 दिवस ते 1 वर्ष – 4.90
1 वर्ष ते 2 वर्षे – 5.70
2 वर्षे ते 3 वर्षे – 5.80
3 वर्षे ते 5 वर्षे – 6.10
5 वर्षे ते 10 वर्षे – 6.00

ICICI बँकेने विशेष FD सादर केली
बँकेने 30 सप्टेंबर रोजी ‘गोल्डन इयर्स एफडी’ लाँच केली असून ग्राहक 6 ऑक्टोबरपर्यंत त्यात गुंतवणूक करू शकतील. तुम्हाला नवीन FD मध्ये अतिरिक्त व्याज मिळेल त्यामुळे ती मर्यादित कालावधीची FD आहे. या एफडीचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 0.10 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल. हे व्याज त्यांना आधीच देण्यात येत असलेल्या 0.50 टक्के अतिरिक्त व्याजाच्या वर असेल. ICICI बँक 2 कोटी रुपयांपेक्षा कमी 5 ते 10 वर्षांच्या FD वर ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के व्याज देते. याचा अर्थ ज्येष्ठ नागरिकांना नवीन एफडीमध्ये 6.70 टक्के व्याज मिळेल.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now