जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील सरपंच, उपसरपंच व ११ सदस्याविरुद्धचे अपात्रतेची अपील अप्पर आयुक्त नाशिक यांनी फेटाळले आहे. त्यामुळे अप्पर आयुक्तांच्या या निर्णयामुळे आडगाव या मोठ्या ग्रामपंचायतचे सरपंच ,उपसरपंच व ११ ग्रामपंचायत सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
निवडणूक खर्चाचा हिशोब वेळेत आणि कायदेशीर रीतीने सादर केलेला नसल्यामुळे आडगाव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत ११ सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी डॉ. प्रवीण वाघ यांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद ऐकून सर्व सदस्यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्याच्या निर्णय १६ फेब्रुवारी २०२२ रोजी दिला होता. त्या निकालाविरुद्ध डॉ. वाघ यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील दाखल केले असता अप्पर आयुक्त भानुदास पालवे यांनी सुनावणी घेऊन अपील फेटाळून सदस्यांचे सदस्यत्व कायम ठेवले आहे. आडगाव येथील ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या वर्षी अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली होती सरपंच सुनील दिलीप भिल, उपसरपंच दिलीप नथू पवार, सदस्य प्रविण सुदाम पाटील, प्रल्हाद पोपट पाटील, शारदा दिराज पाटील ,रवींद्र साबळे, संगीता महाजन, माया वनवे, कविता देवरे अशा साबळे, सीमा महाजन, मुक्ताबाई राठोड, सखुबाई माळी यांनी निवडणुकीच्या खर्च वेळेत व नियमाप्रमाणे सादर केला नाही म्हणून त्यांचे सदस्य रद्द करून त्यांना अपात्र करण्यात यावे असा अर्ज डॉक्टर प्रवीण वाघ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ व अंतर्गत सादर केला होता जिल्हाधिकारी यांनी कायदेशीरपणे सुनावणी घेऊन सदस्यांनी मुदतीत खर्च सादर केल्याचे सिद्ध झाल्यामुळे सदस्यांचे सदस्यत्व कायम ठेवून अर्ज फेटाळल्याच्या निकाल दिला होता.
सदर निकालाविरुद्ध डॉक्टर वाघ यांनी अप्पर आयुक्त नाशिक यांचे कोर्टात अपील दाखल केले असता त्यावर सुनावणी होऊन ग्रामपंचायत सदस्यांनी विहित मुदतीत विहित रीतीने दैनंदिन खर्च आवश्यक बिलांसह सादर केलेल्या असून लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सदस्यांना तांत्रिक कारणाने अपात्र ठरविता येणार नाही असा युक्तिवाद सरपंच, उपसरपंच व सदस्यांचे वकील ॲड विश्वासराव भोसले यांनी मांडला ॲड भोसले यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सदस्यांचे सदस्यत्व कायम ठेवण्याच्या निर्णय अपरायुक्त पालवे यांनी दिला आहे. सरपंच व सदस्यांच्या वतीने ॲड विश्वासराव भोसले यांनी काम पाहिले सदर निकाल लागल्याचे कळाल्यावर आडगाव येथे छबु चौधरी, उत्तम पाटील, डॉ. सुधाकर महाजन, धनराज चव्हाण, जिभाऊ मोरे, कैलास तागड, विलास खैरनार यांचे सह ग्रामस्थांनी फटाके फोडून जल्लोष केला आमदार चिमणराव पाटील यांचे सह इतर पदाधिकाऱ्यांनी निकालावर समाधान व्यक्त करून सरपंच व त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन केले आहे.