तरुणीवर भरदिवसा गोळीबार, अंगावर शहारे आणणारा Video समोर

सप्टेंबर 29, 2022 11:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आलीय. येथे प्रेम प्रकरणातून एक तरुणाने तरुणीवर भरदिवसा गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गोळीबारात स्नेहा दिनेशकुमार मेहतो या तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर गोळीबारानंतर तरुणाने सीआयएसएफच्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्या केली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, तरुणीवर झालेल्या गोळीबाराची ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबतचा व्हिडीओ lokmat.news18 ने प्रकाशित केला आहे.

bhoisar crime news jpg webp

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णदेव यादव आणि नेहा महतो यांचे एकमेकांवर प्रेम होते. एवढेच नाही तर या प्रेमी युगुलाने खैरापारा येथील एका उद्यानात एकमेकांना आलिंगन देऊन फोटो काढले. यानंतर प्रियकर कृष्णा सत्यदेव यादव याने दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमा हॉस्पिटलजवळ गावठी कट्टा याने प्रेयसी नेहा महतोवर गोळी झाडली. या घटनेत नेहाचा जागीच मृत्यू झाला आहे.

https://twitter.com/News18lokmat/status/1575348340816228355

त्यानंतर तरुणाने घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या डी डेकर कंपनीसमोर आरोपींनी सीआयएसएफच्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.गंभीर जखमी यादव याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचाही उपचारापूर्वी मृत्यू झाला. गावठी कट्टा जप्त करून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now