मोठी बातमी : उत्तर महाराष्ट्राला गुजरातशी जोडणारा धानोरा पूल कोसळला

सप्टेंबर 29, 2022 11:39 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । नंदुरबार तालुक्यातील धानोरा मार्गे गुजरात राज्यात जाणाऱ्या रस्त्यावरील रंका नदीवरील असलेला पूल सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान कोसळला आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली असून यामुळे पुन्हा एकदा राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाचे ढिसाळ काम समोर आले आहे. हा पूलाच्या मध्यभागी तडा पडल्याने नदीत कोसळला आहे. पर्यायी मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. (dhanora pool fall down)

dhanora jpg webp

नंदुरबार जिल्हा हा गुजरात राज्याच्या सीमेलगत आहे. चाळीस ते पन्नास किमी अंतरावर गुजरात राज्याची सीमा हद्द असल्याने नंदुरबार येथून बहुतांशी नागरिक गुजरातला जाण्यासाठी राज्यमार्ग क्रमांक सहा असलेल्या नंदुरबार तालुक्यातील धानोरा मार्गे जात असतात. त्यामुळे या मार्गावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. मात्र आता हा पूल पडल्याने महामार्ग ठप्प झाला आहे.

सुदैवाने पूल कोसळण्यावेळी या मार्गावरून वाहन जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. रंका नदीवरील पूल कोसळल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील पूल कोसळला असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. . निकृष्ट दर्जाच्या कामामुळे राज्य महामार्गावरील पूल कोसळल्याने पुन्हा एकदा राज्य महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now