⁠ 
शनिवार, मे 18, 2024

एरंडोलला हिंस्र प्राण्याने पाडला जनावरांचा फडशा 

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Erandol News-जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील जवखेडेसीम येथे हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात पाच जनावरे ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

संजय पाटील यांची गावालगत शेतीत बैल जोडी, गायी , वासरे यांच्यासह १० ते १२ पाळीव जनावरे आहेत. पाटील हे मंगळवारी सकाळी गायीचे दूध काढण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी लागलीच शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांना माहिती कळवली. तर वासुदेव पाटील यांनी वनविभागाला कळवले. वनरक्षक विजय माळी, वनमजूर रविंद्र पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत नागने ( आडगाव ) यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शेतकरी पाटील यांचे लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.