⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | वरखेडेला बिबट्याने पाडला गायीचा फडशा!

वरखेडेला बिबट्याने पाडला गायीचा फडशा!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । गिरणा पट्यात बिबट्याकडुन गुरांवर होणारे हल्यांचे सत्र अद्यापही सुरुच आहे. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे बिबट्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेनंतर पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. 

तालुक्यातील वरखेडे येथील दगा हारसिंग पवार यांचे शेत गावातील सरदार पठाण हा व्यक्ती निमबटाईवर करत असुन त्याच शेतात त्याने आपली नवती वासरी (गाय) बांधलेली होती. आज सकाळी सरदार पठाण नेहमीप्रमाणे शेतात गेले असता त्यांना गाईचा मानेजवळचा भाग खाल्लेला दिसला. गायीच्या आजुबाजुला रक्ताचे थारोळे पडलेले होते. घटनेची माहिती वनविभागाला दिली असता त्यांनी गावातील त्यांचे वनमजुर यांना पहाणी करायला लावले. मात्र हा हल्ला बिबट्याने केला असल्याच्या माहितीला वनविभागाने दुजोरा दिला.

गुरांवर हाल्ले करणारा बिबट्या हा गिरणा परिसरातील मेहुणबारे, लोंढे, वरखेडे, पिंपळवाड म्हाळसा, वरखेडे खुर्द आदी भागात बिबट्याचा वावर असुन सर्वाधिक हल्ले हे वरखेडे शिवारात झाले आहेत. सध्या कापुस वेचणीचे दिवस असुन त्यामुळे मजुरांमध्ये भीती पसरली आहे. वनविभागाने या भागात पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह