⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | वलठाण आश्रमशाळेतील उपशिक्षिका अलका सरदार यांना ‘नेशल बिल्डर अवार्ड’ जाहीर!

वलठाण आश्रमशाळेतील उपशिक्षिका अलका सरदार यांना ‘नेशल बिल्डर अवार्ड’ जाहीर!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील वलठाण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील ज्येष्ठ उपशिक्षिका अलका वामन सरदार यांना रोटरी क्लब आॕफ मिल्क सिटीचा यंदाचा नेशल बिल्डर अवार्ड जाहीर झाला आहे. एका विशेष सोहळ्यात खा. उन्मेष पाटील, आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना तो प्रदान करण्यात येणार आहे.

सरदार यांनी कोरोना काळात थेट नंदुरबार जिल्ह्यात जाऊन आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके पोहचविण्यासाठी पायपीट केली. याच काळात वाडी – वस्त्यांवर जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांना अध्यापनही केले. अध्यापनात आदिवासी बोली भाषेचा वापरही त्या करतात. त्यांच्या याच शैक्षणिक प्रयोगांची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह