⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | दुर्दैवी : ४८ तासात मालवली दोन्ही भावांची प्राणज्योत

दुर्दैवी : ४८ तासात मालवली दोन्ही भावांची प्राणज्योत

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ सप्टेंबर २०२२ । पाचोरा तालुक्यातील एक दुर्दैवी घटना समोर आलीय. गेल्या सहा महिन्यांपासून आजाराशी झुंज देत असतांना मोठ्या भावाचे निधन झाल्याने त्याचा धसका घेऊन लहान भावाचे देखील निधन झाले आहे. ही घटना पाचोरा तालुक्यातील निंभोरी खु येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय आहे घटना?
निंभोरी खु” येथील माजी पोलिस पाटील कै. तुळशिराम नारायण दिवटे यांचा मोठा मुलगा गजानन तुळशिराम दिवटे (वय ३३) याचे मंगळवारी दि. २० रोजी पहाटे पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यानंतर त्यांचा लहान भाऊ राहुल तुळशिराम दिवटे हे गेल्या सहा महिन्यांपासून आजाराशी झुंज देत असतांना मोठ्या भावाचे निधन झाल्याने त्याचा धसका घेऊन राहुल दिवटे (वय ३१) यांचे गुरुवारी सकाळी तीन वाजता अवघ्या ४८ तासांच्या अंतराने निधन झाले.

गजानन दिवटे यांच्या सारीचा कार्यक्रम सकाळी ९ वाजता आटोपल्यानंतर दुपारी बारा वाजता राहुल यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे निंभोरी गावावर शोककळा पसरली आहे. गजानन यांच्या पश्चात आई, एक मुलगा, एक मुलगी, तर राहुल यांच्या पश्चात आई, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.