Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२२ । नाशिक येथील विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, मनोहर रसाळी (कार्यालय अधीक्षक), अतुल बाळेद(टीव्ही कॅमेरामन) व प्रमोद जाधव (छायाचित्रकार) यांनी श्री मंगळग्रह मंदिरास भेट दिली. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील सचिव सुरेश बाविस्कर व संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले.
मंगळग्रह सेवा संस्था करीत असलेले कार्य व मंदिराविषयी त्यांना माहिती दिली. संस्था राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल त्यांनी खूप समाधान व्यक्त केले. मंदिर परिसरातील शांतता, सेवेकाऱ्यांची नम्रता व संस्थेच्या कार्यातील पारदर्शकतेची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.