⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | मुक्ताईनगर | मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३० हजार सभासदांची नोंदणी करण्याचा निर्धार!

मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३० हजार सभासदांची नोंदणी करण्याचा निर्धार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या तेराव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील तापी काठावर असणाऱ्या भिल्ल वस्ती लूमखेडा, लूमखेडा, रणगाव,तासखेडा,गहूखेडा, सूदगाव,रायपुर या गावांमध्ये ग्रामस्थांसमवेत संवाद साधला. यावेळी त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

ग्रामस्थांसमवेत संवाद साधताना रोहिणी खडसे म्हणाल्या की, अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्टपासून सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला सर्वत्र प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. बोदवड तालुक्याचा व मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसराचा पहिला टप्पा संपला असून या निमित्ताने गावागावातील ग्रामस्थांकडून विविध समस्या आमच्यापर्यंत येत आहे… त्या कशा सोडवता येतील यासाठी नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाने प्रयत्न सुरु आहेत. नाथाभाऊंनी त्यांच्या कार्यकाळात तापी काठावरील प्रत्येक गाव चहूबाजुनी डांबरी रस्त्यांनी जोडले प्रत्येक गावात अंतर्गत काँक्रीटीकरण, सभागृह, व इतर मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला आगामी काळात सुद्धा नाथाभाऊंच्या माध्यमातून राहिलेले विकास कामे पूर्ण करण्यात येतील. या यात्रेत आबालवृद्धासह युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेच्या निमित्ताने नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३० हजार सभासद नोंदणी करण्याचा निर्धार आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, रोहिणी खडसे यांनी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद असून कोणतेही संविधानिक पद नसताना त्या जनतेच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी गावोगाव जात आहेत. आपण मांडलेल्या समस्या एकनाथराव खडसे आणि पक्षाच्या माध्यमातून आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.या निमित्ताने ३० हजार सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले असून नवीन सदस्य होण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक प्रयत्न करण्याचे उपस्थित कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले. यावेळी राजेश वानखेडे, रमेश नागराज पाटील, निळकंठ चौधरी, यु डी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

यात्रेत माजी जि प सद्स रमेश नागराज पाटील,बाजार समिती संचालक पंकज येवले,यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील, रावेर तालुका अध्यक्ष निळकंठ चौधरी, जि प सदस्य कैलास सरोदे,प स सदस्य दिपक पाटील,जेष्ठ नेते हेमराज पाटील, सचिन पाटील,साई राज वानखेडे,रामभाऊ पाटील,योगिता वानखेडे,शांताराम पाटील, गोपी पाटील, मधुकर पाटील, कमलाकर पाटील,शशांक पाटील,योगेश्वर कोळी, अमोल महाजन,सिद्धार्थ तायडे, भागवत कोळी, भुषण चौधरी, श्रीकांत चौधरी, वाय डी पाटील, दिपक कोळी, गजानन लोखंडे, किशोर पाटील, प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भाल शंकर, नंदू भाऊ हिरोळे, भुषण पाटील, चेतन राजपूत, भुषण धनगर,रोहन च-हाटे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होते.

रायपुर येथील रूपेश पाटील, सरपंच तुकाराम तायडे, उपसरपंच बापु पाटील, ज्ञानेश्वर तायडे, पवन तायडे, राजु तायडे, संतोष तायडे, सोपान तायडे, सागर तायडे, सतिश तायडे नितीन तायडे, विश्वनाथ तायडे, विनोद भोई, रतिलाल भोई, राजु भोई, गोलु मोरे, अनिल तायडे, बंटी तायडे, सुदगाव येथी लनागेश पाटील, नुतन तायडे, पुष्पा ताई पाटील, नरेंद्र पाटील, विशाल सपकाळे, चेतन प्रजापती, चेतन धनगर, सुरेश पाटील, प्रविण सोनवणे, समाधान सोनवणे, संदिप सपकाळ, संजय तायडे, विजय सोनवणे, गहूखेडा येथील मधुकर रघुनाथ पाटील, वसंत चावदस पाटील, राजेंद्र चौधरी,उमेश कोळी,गणेश पाटील, अनिल चौधरी, गोपाळ पाटील, भागवत पाटील,कैलास पाटील मुन्ना पाटील, निशिकांत पाटील, यश पाटील, उमेश तायडे, पिंटू तायडे, जयेश चौधरी, अशोक पाटील, मयुर चौधरी, अक्षय चौधरी, कोमल पाटील, सरला चौधरी, सुरेखा सपकाळे, नंदा पाटील, कल्पना पाटील, मयुरी चौधरी,लहाणू कोळी, दिलीप पाटील, नरेंद्र तायडे,नितीन भालेराव, लक्ष्मण चौधरी, पवन कोळी, रोहित सपकाळे,साहेबराव भालेराव, समाधान तायडे,पवन कोळी, रोहित सपकाळे,संतोष पाटील, हर्षल चौधरी,मुकेश पाटील,मनोहर भालेराव,रवींद्र सोनवणे, अशोक चौधरी,विठ्ठल सुतार आदी.

रणगाव येथील सरपंच संदिप कोळी,उपसरपंच नितीन पाटील, बळीराम पाटील, सुधाकर पाटील, सदाशिव पाटील, संजय पाटील, घनश्याम पाटील, चिंतामण पाटील, निलेश पाटील, राजु चौधरी, सुनिल पाटील, धनराज पाटील, धनंजय कोळी, साहेबराव पाटील, दिनेश कोळी, गणेश कोळी, दिपेश पाटील, मुरलीधर पाटील, राजु कोळी, योगेश पाटील, पंडित पाटील, भागवत कोळी, तासखेडा येथील ज्ञानेश्वर पाटील, गोकुळ कुंभार,समाधान पाटील,कैलास पाटील, संतोष पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, लूमखेडा येथील शांताराम पाटील, वासुदेव पाटील, भिकाजी पाटील,दगडू पाटील, ज्ञानेश्वर पाटील,ईश्वर चौधरी, प्रकाश पाटील,बाळू भाऊ बा-हे,शेख रज्जाक,शेख कालू, राजु कोळी, प्रवीण पाटील आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह