Muktainagar news-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । राज्यात होमगार्ड या मानसेवी स्वयंसेवी संघटनेची स्थापना 6 डिसेंबर 46 रोजी म्हणजेच स्वातंत्र्य पूर्वी झाले आहे परंतु, सैनिकांची आज अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून गृहरक्षक दलाच्या जवानांच्या मागण्या प्रलंबित असून त्या मार्गी लावाव्या, अश्या मागणीचे निवेदन होमगार्ड संघटनेच्या वतीने आमदार चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले.
शासनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये महामारी शासनाचे विविध उपक्रमांमध्ये कायदा व व्यवस्था राखणे, कामे, भूकंप पूर दुष्काळ मोर्चे.. सेवा अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहे. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना होमगार्ड वर उपासमारीची वेळ आलेली आहे. राज्यात 55 हजार हून अधिक होमगार्ड पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून तुटपुंजा मानधनावर आपले कर्तव्य इमानदारीने बजावत आहे. त्यातच वर्षभरात केवळ 30 ते 40 दिवस काम मिळत आहे त्यामुळे इतर कामे सुद्धा करू शकत नाही. ड्युटीच्या काळात इतर कामे बंद करावी लागतात व पुन्हा ड्युटी संपल्यानंतर हातची कामे गेल्यानंतर कामांसाठी भटकंती करावी लागत आहे, त्यामुळे बऱ्याचदा होमगार्ड वर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यासाठी सैनिकांना वर्षभर काम मिळावे निष्काम सेवा हे ब्रीदवाक्य काढून त्यात बदल करावा होमगार्ड अधिनियम 1947 मध्ये बदल करावा तीन वर्षानंतर होणारी पुनर्नियुक्ती कायमस्वरूपी बंद करावी होमगार्ड मध्ये सलग पाच वर्षे सेवा बजावल्यानंतर पात्र होमगार्ड सैनिकांना पोलीस शिपाई अथवा अंमलदार पदी थेट नियुक्ती मिळावी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा व सवलती मिळाव्यात पोलिसांप्रमाणे समान काम समान वेतन मिळावे होमगार्ड यांना राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा अशा मागण्यांचे निवेदन मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले.
याप्रसंगी विकास जुमळे, विजय बोराखेडे , शिवराम पाटील , महेंद्र बोरसे , विजय गवळी , सिद्धार्थ धुंदे , सोपान बेलदार , सुभाष सोनवणे यांच्यासह इतर पुरुष व महिला होमगार्ड आदी उपस्थित होते.