चाळीसगावला संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर उत्साहात

सप्टेंबर 18, 2022 4:35 PM

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने तसेच संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन, दिल्ली व चाळीसगाव, बहाळ शाखेच्या संयुक्त विद्यमाने आज येथील अखंडीरित्या स्व. चंदीराम बजाज सत्संग भवन, बसंती ऑईल मिल च्या बाजूला, सिंधी कॉलनी, हंस टॉकीज रोड, चाळीसगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

jar water

रक्तदान शिबिराचे उदघाटक संत निरंकारी मंडळाचे धुळे झोन चे झोनल इंचार्ज आ. हिरालाल खैरनार, स्थानिक नगरसेवक शेखर शेट बजाज यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या सुरवातीला शहरात पायी रॅली काढून जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आहे होते. यावेळी जनतेला रक्तदान केल्याने आपण एखाद्या गरजू चा जीव वाचऊ शकतो त्यामुळे सर्वांनी रक्तदान करण्यास जरूर यावे अशी विनंती संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now