⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | दुर्दैवी : लिप्ट बसवताना सीडी सरकल्याने शिरूडच्या दोन तरुणांचा मृत्यू

दुर्दैवी : लिप्ट बसवताना सीडी सरकल्याने शिरूडच्या दोन तरुणांचा मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील तरुणांचा लिप्ट बसवण्याचे काम सुरू असताना सतरा मजली ईमारतीच्या सोळाव्या मजल्यावरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घडली आहे. या घटनेनेमुळे शिरूड गावात शोककळा पसरली आहे.

निलेश प्रल्हाद पाटील (28) व आकाश सुनील बोरसे (22) अशी मयतांची नावे आहेत. तालुक्यातील शिरूड गावातील रहिवासी असलेले निलेश पाटील व आकाश बोरसे हे तरुण रोजगारानिमित्त सुरत येथे कामानिमित्त वास्तव्यास गेले होते. सुरतच्या पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा नामक सतरा मजली इमारतीत निलेश प्रल्हाद पाटील (28) व आकाश सुनील बोरसे (22) या त्या ठिकाणी लिफ्ट बसविण्याचे काम करत असताना शुक्रवारी सकाळी कामावर गेल्यानंतर दोघे तरुण एकाच सीडीवर उभे राहून काम करीत असताना सीडी सरकल्याने 17 व्या मजल्यावरून पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, काही कामगारांनी परीसरात काम करणार्‍या कामगारांना ही घटना सांगितली. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी पंचनामा करून दोघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात हलवले. या घटनेने शिरूड गावात शोककळा पसरली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह