जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२२ । अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचं का असा प्रश्न मंत्री गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे. महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार नुकतेच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांवर टीका केली होती. यावर उत्तर देताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हा प्रश्न विचारला.
याच बरोबर मंत्री गुलाबराव पाटील असेही म्हणाले कि, जळगाव जिल्ह्यातील कोणती जागा कोणाला द्यायची हे महाविकास आघाडीमध्ये ठरलेले नाही. कारण माझ्या जळगाव ग्रामीण मतदारसंघात पाच वेळा शिवसेनेचा उमदेवार निवडून आला, ही जागा राष्ट्रवादीला जाणार आहे का?माझ्या विरोधात दोन गुलाबराव फिरत आहेत. दोन्ही आतापासून आमदार झालेले आहे. यामुळे आधी त्यांनी ठरवाव की त्यांचा खरा नवरदेव कोण? अस म्हणत गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर व शिवसेनेचे गुलाबराव वाघ या दोघांना टोला लगावला.
तर दुसरीकडे ते असेही म्हणाले कि, महाविकास आघाडीचा उमेदवारच ठरत नाहीये, मतदारसंघच ठरलेला नाही आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनच्या निवडणुकीमध्ये अजून त्यांची युती पक्की झालेली नाही. तर आमदारकीची निवडणुक कोणी पाहिली आहे? असा टोलाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला.
.