⁠ 
शनिवार, सप्टेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | बकालेंना बडतर्फ करा.. आमदार मंगेश चव्हाणचे मुख्यमंत्र्यांना पत्र

बकालेंना बडतर्फ करा.. आमदार मंगेश चव्हाणचे मुख्यमंत्र्यांना पत्र

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १६ सप्टेंबर २०२२ । निलंबित पोलीस निरीक्षक बकाले याला बडतर्फ करावे तसेच चाळीसगाव RTO वसुली प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी काल १५ रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची भेट घेतली व सविस्तर पत्र दिले. दोन्ही घटनांचे गांभीर्य लक्षात घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. अशी माहिती आमदार चव्हाण यांनी ‘जळगाव लाईव्ह’ला दिली.

तसेच सर्वसामान्य ट्रक व वाहन चालक यांच्याकडून हफ्ते घेणाऱ्या चाळीसगाव येथील RTO वसुली प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांनी आरोप केलेले राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही तसेच त्यांना अभय देणारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी- कर्मचारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांना दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे RTO यांना हफ्ता देणाऱ्या १०० ट्रक व वाहन चालकांची यादी दिली असून त्यांचा जबाब घेतला जाणार आहे. असे देखील आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

माझा पाठपुरावा सुरु राही
माझी लढाई ही कुठल्या व्यक्ती अथवा जाती विरोधात नसून अन्यायी, भ्रष्टाचारी व जातीयवादी प्रवृत्तीविरोधात आहे. या प्रवृत्तीमुळे गोर-गरीब, वंचित, पिडीत घटक यांच्यावर अन्याय होतो, त्यांचे शोषण होते. त्यामुळे यांना धडा शिकविण्यासाठी जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझा पाठपुरावा सुरु राहील. – आमदार मंगेश रमेश चव्हाण

author avatar
टीम जळगाव लाईव्ह