⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | गुड न्यूज : मन्याड धरण शंभर टक्के भरले!

गुड न्यूज : मन्याड धरण शंभर टक्के भरले!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Chalisgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असलेले गिरणा आणि जळगाव जिल्ह्यातील मन्याड धरणांचा फायदा जळगाव जिल्ह्याला सर्वाधिक आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वीच २१५०० दशलक्ष घनफुटक्षमतेचे गिरणा धरण पाण्याने पूर्णपणे भरल्याच्या पाठोपाठ आता, गेल्या पाच-सहा दिवसात नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे मन्याड धरणही शंभर टक्के भरले असून शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

काही गावांचा पिण्याचा व सिंचनाच्या पाणी प्रश्‍न मिटला
मन्याड धरणाचाही पाणी साठवण क्षमता ही एकोणवीस झिरो पाच दशलक्ष घनफूट इतकी आहे. या दोन्ही धरणातील पाणीसाठा पूर्ण झाल्यानंतर या दोन्ही धरणातून अनुक्रमे गिरणा धरणातून ४८ ८८ २१ तर मन्याड धरणातून ८०.३४ क्युसेस पाणी नदीपात्रातून वाहत आहे. दोन धरणभरल्याने चाळीसगाव तालुक्यासह जिल्ह्यातील काही गावांचा पिण्याचा व सिंचनाच्या पाणी प्रश्‍न मिटला आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह