Accident : रावेर-जळगाव बसला कंटेनरची धडक, दोन प्रवासी जखमी

सप्टेंबर 15, 2022 12:47 PM

raver news-जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । रावेरकडून जळगावकडे जाणाऱ्या बसला समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. यात दोन प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने उर्वरित १८ प्रवाशांना काहीही दुखापत झाली नाही.

jalgaon 2022 09 14T120609.717 jpg webp

जळगाव आगाराची रावेर-जळगाव (एमएच ४o एन ९८३४) या क्रमांकाची बस मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता रावेर येथून जळगावकडे रवाना झाली. त्याचवेळी सावद्याकडून येणारा (डीडी ०३ एम ९४३२) या क्रमांकाचा ट्रक कंटेनरने बसला धडक दिली. अपघातानंतर बस शेतात घुसली. यामुळे बसमधील दोन प्रवासी खिडकीच्या तुटलेल्या काचा लागल्याने जखमी झाले. बस अपघाताचे वृत्त कळताच वाहतूक पोलिस भागवत धांडे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवून वाहतूकही सुरळीत केली. याप्रकरणी रावेर पाेलिसांत अपघाताची नाेंद झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now