⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | आश्चर्य : शिवकॉलनी स्टॉपजवळ महामार्गाला आली सूज, माजी नगरसेवकाने शेअर केलेला फोटो होतोय व्हायरल!

आश्चर्य : शिवकॉलनी स्टॉपजवळ महामार्गाला आली सूज, माजी नगरसेवकाने शेअर केलेला फोटो होतोय व्हायरल!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । जळगाव शहरात रस्त्यांची तर वानवा झालेलीच आहे परंतु नुकतेच तयार करण्यात आलेल्या महामार्गाचे काम देखील निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे वारंवार दिसून येत आहे. बांभोरी पुलापासून शहराकडे येणाऱ्या महामार्गावर अनेक ठिकाणी चढउतार तयार झाले असून काही ठिकाणी खड्डे देखील पडले आहे. जळगाव शहरातील माजी नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी महामार्गाचा एका फोटो सोशल मीडियात शेअर केला असून महामार्गाला सूज आल्याचे म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर या फोटोची तुफान चर्चा आहे. Surprise: Swelling of highway near Shiv Colony stop

जळगाव शहरतातील रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि नव्याने तयार होणारे रस्ते यावर न बोललेलंच बरे. जळगावातील काही समाजसेवक आणि पुढारी देखील आपल्या सोयीचे राजकारण करताय परंतु रस्त्यांवर बोलायला कुणीही तयार नाही. शहरात खड्ड्यामुळे अनेकांना आजार जडले असून कितीतरी नागरिक जायबंदी झाले आहे. आपल्याला होणारा त्रास आपण सहन करू मात्र कुणाच्याही विरोधात बोलायचं नाही असा पवित्र जळगावकरांनी घेतला आहे. मुळात जळगावकर एकजूट दाखवत नसल्याने हि बोंब आहे.

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले असून दोन ठिकाणी उड्डाणपूल देखील उभारण्यात आले आहे. महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप नेहमी होत असतो. महामार्गाचे काम करताना पथदिवे लावण्याचा देखील ‘नही’ला विसर पडला होता. काही दिवसांनी पुन्हा तोडफोड करीत काम हाती घेण्यात आले. महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही महिन्यातच महामार्गाची वाट लागली असल्याचे नागरिक बोलत आहे.

विशेष म्हणजे महामार्गावर आहुजा नगर ते अग्रवाल चौकादरम्यान अनेक ठिकाणी रस्ता चढउताराचा झाला आहे. रस्त्यावर चढ उतार सरळ दिशेने नव्हे तर आडव्या दिशेने झाला आहे. एखादा वाहनधारक सरळ दिशेने जाण्यास निघाला आणि रस्त्याच्या एखाद्या बाजूला वळत असला तर त्याचा तोल ढासळतो. कालपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महामार्गाचे आणखीनच पितळ उघडे पडले असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे. माजी नगरसेवक नितीन नन्नवरे यांनी याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

महामार्ग प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आणि रस्त्याच्या कामाबाबत कोण कधी आवाज उठवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.