धक्कादायक : ‘त्या’ अपघातातील तरुणाची अखेरची झुंज संपली, दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक!

सप्टेंबर 12, 2022 11:56 AM

Muktiatnagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील मलकापुर-बऱ्हाणपुर रस्त्यावरील कुंडनजीकच्या पुर्णा नदीच्या घोडसगाव पुलावर शनिवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास गणेश विसर्जनादरम्यान गणपतीची आरती सुरु असताना ट्रॅक्टरला मागून आयशरने धडक दिल्याने अपघात झाला होता. यात काही जण जखमी झाले होते त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यातील एकाची अखेरची झुंज संपली असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची समिती समोर आली आहे.

Accident death 2 jpg webp

चिखली येथील ‘गणेशभक्त मंडळातील’ अध्यक्ष भागवत उर्फ एकनाथ शंकर कांडेलकर (वय २४ रा.चिखली) असे मयताचे नाव आहे. आयशर वाहनचालक प्रल्हाद माॅझी (पुर्ण पता माहीत नाही) याची प्रकृती चिंताजनक आहे. तर चिखली येथील ‘गणेशभक्त’ मंडळातील विकी अरुण बागुल,दिपक संजय वानखेडे,विजय कैलास चंदनकर,गणेश गुलाब पारधी, आकाश सुरेश वाढे, सिद्धार्थ संजय वानखेडे,अक्षय कैलास चंदनकर आदी जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडुन मिळाली.

याबाबत मयताचे चुलतभाऊ विकास विठ्ठल कांडेलकर रा.चिखली ता.मुक्ताईनगर यांच्या फिर्यादीवरून काल सायंकाळी मुक्ताईनगर पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला. आयशर वाहन पोलीसांच्या ताब्यात असून वाहनमालकाशी पोलीस संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे. पो.ह.संजय पाटील,पो. काॅ. हेमंत महाजन, अनिल देवरे,कोळी आदींनी अपघातस्थळी भेट दिली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now