जळगाव जिल्हा

प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगाव-भुसावळ मार्गे धावणाऱ्या तीन रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, भुसावळ मार्गे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तीन रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून, एका एक्स्प्रेस गाडीचे नियमन तर दोन गाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव आणि भुसावळ परिसरातील प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश आहे.

रेल्वेच्या वेळापत्रकानुसार, गाडी क्र २०६२५ चेन्नई-भगत की कोठी एक्स्प्रेसला कुरुम स्थानकावर एक तास नियंत्रित करणार आहे. गाडी २६१०२ अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस अजनी स्थानकातून निर्धारित वेळेपेक्षा एक तास ५५ मिनिटे उशिराने रवाना होईल. तसेच गाडी ६११०२ बडनेरा-भुसावळ मेमू बडनेरा स्थानकातून एक तास उशिराने सुटणार आहे.

रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात झालेल्या या बदलामुळे प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत स्थिती तपासून घ्यावी. विशेषतः जळगाव आणि भुसावळ रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही रेल्वेच्या अधिकृत सूचना तपासून प्रवासाचे नियोजन करावे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button