ठाकरेंना पुन्हा धक्का : हा बडा नेता गेला शिंदे गटात

सप्टेंबर 10, 2022 1:44 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज । १० सप्टेंबर २०२२ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार फोडून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर राज्यभरातून अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी, नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात सामील झाले.  आता अजून एक बडा नेता शिवसेना सोडून शिवसेनेत गेला आहे. एका माजी आमदाराने शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सदानंद चव्हाण यांनी अखेर शिवबंधन तोडले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये सामील झाले आहेत. आपल्या समर्थकांसह त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. उद्योग मंत्री उदय सामंत हेही या वेळी उपस्थित होते.

shinde claim shivsena jpg webp

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. आगामी काळात चिपळूण मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघासाठी ते निधी देणार असतील तर माझा त्यांना पाठिंबा आहे, असे मी त्यांच्याशी बोललो आहे. पुढील दोन वर्षांत चिपळूणसाठी जास्तीत जास्त निधी आणून विकास कामे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.असे चव्हाण म्हणाले.

चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा निवडून आलेले चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी अस्वस्थता व्यक्त केली होती. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी २००४ मध्ये पक्ष सोडल्यानंतर चिपळूणमध्ये संपलेली शिवसेना मी उभी केली, असा दावा ते वारंवार करत होते. पण मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चव्हाण सक्रिय राजकारणापासून दूर होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now