⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

जैन इरिगेशन सिस्टिम्स मेहरुण तलाव परिसरात उभे करणार पोलीस मदत केंद्र!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२२ । विक्रांत मिश्रा या बालकाच्या मृत्यूची घटना सर्वांसाठीच चटका लावून जाणारी आहे, समाजातील सर्वच घटकांना जागरूक करणारी आहे. या परिसरातील गैरप्रकार, वाहनांची रेस व इतर विषय बंद होण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी या परिसरात पोलीस मदत केंद्र उभारण्यात येईल असे जाहीर केले असून जैन इरिगेशन च्या वतीने त्वरित पोलीस मदत केंद्र उभे करून देण्यात येईल अशी घोषणा जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली आहे.

तसेच मेहरूण तलाव परिसर हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असून वरील गोष्टीना त्वरित आळा बसावा यासाठी या परिसरात महानगरपालिका जी जागा उपलब्ध करून देईल त्या जागेवर जैन इरिगेशन सिस्टिम्स च्या वतीने त्वरित पोलीस मदत केंद्र उभे करून देण्यात येईल अशी घोषणा जैन इरिगेशन चे अध्यक्ष अशोक जैन यांनी केली आहे.

विक्रांत संतोष मिश्रा हा चिमुकला रविवारी दुपारी चुलतभाऊ जितेंद्रबरोबर तलावाच्या काठी असलेल्या ट्रॅकवर सायकल चालवण्यासाठी आला असता दुपारी घराकडे परतत असताना ट्रॅकवर एकमेकांच्या पुढे जाण्यासाठी भरधाव निघालेल्या दोनपैकी एका कारने (क्रमांक एम.एच. 19 बी.यू.6606) विक्रांतला जोरदार धडक दिल्याने सायकलसह उंच फेकला गेला आणि झाडावर ठोकला जावून जमिनीवर पडल्याने डोक्याला जबर मार लागल्याने जखमी झाला. ट्रॅकवर फिरण्यासाठी आलेल्या लोकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले असता तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले होते.