जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल शहरातील विस्तारित भागातील विरार नगरच्या पाठीमागे तडवी कॉलनीच्यासमोर १३२ केव्ही च्या भिंतीमागे समाज कार्यालयाचे बांधकाम होत असून ते निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे मुख्याअधिकारी यांनी यांकडे लक्ष घ्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहेत. लक्ष न दिल्यास याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल असे देखील बोलले जात आहेत.
येथील समाज कार्यालयाचे व्हॉल कंपाऊंडचे कॉलमचे खड्डे ७ फुट नसून ४ फुट खोदले गेले आहे. त्यात फोन्डेशनची आसारी १२ एमएम नसून १० एमएम टाकण्यात आली आहे. त्यात दगड गोटे भराव करून त्यात हडकाई नदिची वाळू गिरावल टाकून काम सुरु आहे. रेतीचे वापर न करता दगडाची कच याचे वापर होत आहे. सलग १ वर्षापासून समाज मंदिर बांधण्यात आले आहेत. परंतु, वापरण्यासाठी पाणी नाही, दिवा बत्ती नाही, मेन गेट बसवले नाही, खिडकी नाही, सौचालयास दरवाजे नाही. सुमारे १वर्षांपासून हे काम करण्यात येत असून अद्यापही अपूर्ण असून आता व्हॉल कंपाऊट मध्ये भ्रष्टाचार सुरु आहे.
तसेच १३२ केव्ही चे मेन तार कंपाऊंटच्या वरतून गेले आहेत. त्यामुळे इमारतीच्या समोर समाज कार्यक्रम असताना शॉर्ट सर्किट झाल्यास जिवाची हानी होऊ शकते. दरम्यान, संबंधित यावल नगरपरिषदेचे मुख्याअधिकारी यांनी जागेची पाहणी का केली नाही ? असे नागिरकांमध्ये उपस्थित होत आहेत.