जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । सध्या देशात चालू असलेल्या कारभारामुळे महागाई आवाक्या बाहेर जात आहे. त्यामुळे महागाईच्या विरोधात विविध ठिकाणी निदर्शने केले जात असून यावलला देखील युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील परिसरात निर्दशने करण्यात आली. यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात उपहासात्मक घोषणा देत 50 खोके एकदम ओके म्हणत, प्रत्यक्षात खोक्यांवर नकली नोटा चिपकवलेल्या खोके घेऊन निदर्शने करण्यात आली. तसेच याबाबचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.
जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष ॲड. देवकांत पाटील यांच्या नेतृत्वात यावल तालुक्याच्या वतीने सदर निदर्शने करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, यावल तालुका अध्यक्ष मुकेश येवले, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस विनोद लीलाधर पाटील, राजू काशिनाथ पाटील, राष्ट्रवादीचे समन्वयक किशोर माळी, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, विरावली विकास सोसायटीचे चेअरमन नरेंद्र सोनवणे, समाधान पाटील, राहुल चौधरी, शाहरुख तळवी, पवन खरचे, हेमंत दांडेकर, सरदार तडवी, गिरीश शिरसागर, विजय भोई, अजय मोरे, लक्ष्मण बारेला, मन्साराम पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, बिस्मिल्ला तडवी, प्रशांत पाटील यासह असंख्य युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, सध्या आपल्या देशात चालू असलेल्या कारभारामुळे महागाई आवाक्या बाहेर जात आहे. GST चे कोणताही तर्क नाहीत गरिबांची बचत, खाद्य पदार्थ यावरही GSTआकारला जात आहे. आंतरराष्ट्रीय भाव वाढीच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ डिझेल, रासायनिक खतांची दरवाढ महागाईचा वाढता दर २४.३% पेक्षा वाढता बेरोजगारीचा दर या साऱ्या बाबीमुळे संपूर्ण देशातील जनता हवालदील झालेली आहे. शेतकरी पासून व्यापाऱ्या पर्यंत गरीबापासून उच्च पदस्त कर्मचार पर्यंत सर्वाना महागाईने होरपलेले आहे. सरकार श्रीमंतांचे सरकार असून देशाला गरिबीत ढकलत आहे.
एवढेच नव्हेतर नवीनच महाराष्ट्रात आलेले आहे राज्यशासन भोंगळ कारभार करीत आहे. ओला दुष्काळ जाहीर न करणे महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय रद्द करणे, विकास कामासाठी दिलेली निधी रद्द करणे, असे गलथान कारभार कार्य शिंदे सरकार करीत आहे. यांचा कारभार म्हणजे ५०खोके महागाई एकदम ओके या अशा कारभारावर अंकुश लागावा अशी अपेक्षा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने यावेळी करण्यात आली. तसेच महागाई लवकरात लवकर नियंत्रणात आणावी अन्यथा राष्ट्रवादी युवकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.