बाप रे.. भरदिवसा घरफोडी, हजारोंचा ऐवज लंपास

सप्टेंबर 1, 2022 12:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२२ । बोदवड तालुक्यातील राजूर येथे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने 26 हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसात चोरट्याविरुद्व गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

crime house jpg webp

राजू दीपा कोळी (47, चारठाणा, ता.मुक्ताईनगर) असे अटक आरोपीचे नाव आहे. काजल संदीप सिया (23, कुथळे, ता.धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील राजूर येथे वास्तव्यास असून सोमवार, 29 रोजी दुपारी 12.30 वाजता संशयीत राजू कोळी याने 15 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅमची सोन्याची पोत, आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, तीन हजार रुपये किंमतीची गॅस हंडी असा एकूण 26 हजारांचा मुद्देमाल लांबवला. तपास हवालदार वसंत निकम करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now