संतापजनक ! ३० वर्षीय तरूणाने केला ६ वर्षीय बालिकेचा विनयभंग

ऑगस्ट 31, 2022 11:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात महिलांसह मुलींवर होणारे अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाहीय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतच चालले असल्याचे दिसतेय. अशातच जिल्ह्यात अत्याचाराची एक धक्कादायक घटना समोर आलीय. ३० वर्षीय तरूणाने घरासामोरील अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा विनयभंग करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली.

crime 18 jpg webp

पाचोरा शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पिडित बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असुन संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत पाचोरा पोलिसात भाग – ०५ गुरन ३९९ भा.द.वी. ३७६अ, ब, प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात नमुद करण्यात आले आहे की, पिडित बालिका संशयित आरोपीच्या घरी दुपारी त्याच्या मुलीसोबत खेळण्यास आली असता तिला लज्जा निर्माण होइल असे कृत्य केले.

सदर घटनेने घाबरून बालिकेने घडलेला प्रकार घरी सांगितला असता पिडीतेच्या कुटुंबाने पाचोरा पोलिसात याबबत तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपिला अटक केली असुन, नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now