सोन्यामध्ये मोठी घसरण, चांदी 2 वर्षांचा नीचांकी पातळीवर, तपासून घ्या ताजे दर

ऑगस्ट 29, 2022 8:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घट दिसून आली. इंडिया बुलियन असोसिएशनने जारी केलेल्या दरानुसार, शुक्रवारच्या तुलनेत चांदीचा भाव प्रतिकिलो 1405 रुपयांनी घसरून 54205 रुपयांवर आला. त्याचप्रमाणे 24 कॅरेट सोन्याचा भाव 437 रुपयांनी घसरून 51231 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. यापूर्वी 26 जुलै रोजी चांदीचा दर 54155 रुपये प्रति किलोवर गेला होता.

gold silver jpg webp

सोन्या-चांदीवर अधिक दबाव राहील
डॉलरच्या तुलनेत रुपयाही 80.08 रुपयांच्या नीचांकी पातळीवर उघडला. स्थानिक बाजारात, एमसीएक्सवर दुपारी 12 वाजताच्या सुमारास सोने 292 रुपयांच्या घसरणीसह 50946 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत होते. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 1724 डॉलर प्रति औंस या पातळीवर आहे. सोन्या-चांदीवर दबाव कायम राहील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

चांदी दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर
देशांतर्गत बाजारात चांदीच्या दरात 830.00 रुपयांची घसरण दिसून आली आणि तो 53950 रुपयांच्या पातळीवर आला. डिसेंबर डिलीवरी चांदीचा भाव 910 रुपयांनी घसरून 54860 रुपयांवर व्यवहार करत आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता यांनी सांगितले की, सोमवारी चांदी 53785 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आली, जी दोन वर्षांतील नीचांकी पातळी आहे.

रुपया सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला आहे
डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांच्या घसरणीसह 80.08 वर उघडला. शुक्रवारी तो 79.87 च्या पातळीवर बंद झाला. व्यवहारादरम्यान रुपया 80.13 च्या पातळीवर घसरला, ही विक्रमी नीचांकी पातळी आहे. आयआयएफएल सिक्युरिटीजचे अनुज गुप्ता सांगतात की रुपया सर्वकालीन नीचांकावर आहे. त्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. अल्पावधीत, डॉलरच्या तुलनेत रुपया 81.50 च्या पातळीवर घसरण्याची अपेक्षा आहे.

सेन्सेक्स 1466 अंकांनी घसरला
आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारावर प्रचंड दबाव दिसून आला. सोमवारी सकाळी 1466 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 57367 च्या पातळीवर उघडला. निफ्टी 370 अंकांच्या घसरणीसह 17188 च्या पातळीवर उघडला. मात्र, त्यानंतर बाजारात रिकव्हरीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now