⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | यावल | मोकाट गुरांमुळे जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू!

मोकाट गुरांमुळे जखमी झालेल्या प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । यावल शहरातील ६२ वर्षीय प्रौढ मोकाट गुरांचा बळी ठरला आहे. सात दिवसांपूर्वी एका बिथरलेल्या गायीने त्यांना शहरातील योगायोग पेठमध्ये जबर धडक दिली होती. त्यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर जळगाव येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी त्यांचा मृत्यू झाला.

यशवंत पाटील-बारी (वय ६२) असे मयत प्रौढाचे नाव आहे. यावल शहरात मोकाट गुरांची समस्या प्रचंड त्रासदायक आहे. शहरातील बाजारपेठ, प्रमुख रस्ते, चौकात या गुरांचा वावर असतो. अनेकवेळा त्यांच्यामुळे रहदारीला अडथळे येतात. याबाबत पालिकेकडे तक्रारी करूनही प्रशासन दखल घेत नाही. दरम्यान, ऑगस्ट २२ रोजी मोकाट गुरातील बिथरलेल्या एका गायीने योगायोग पेठ, बारी वाड्यातील रहिवासी नथू यशवंत पाटील-बारी (वय ६२) यांना धडक दिली. त्यात नतू पाटील यांच्या डोक्याला इजा झाली. यावलमध्ये प्रथमोपचार करून त्यांना जळगाव येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना ते कोमात गेले. सात दिवस मृत्यूशी झुंज देताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त भावना व्यक्त होत असून मोकाट गुरांचे मालक व पालिकेविरुद्ध मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह