जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२२ । भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गेल्या सोमवारी सुमारे दहा टळन तांदुळ काळ्या बाजारात विक्री होण्यापूर्वीच पकडला होता. या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पकडलेला तांदुळ आता महसूल विभागाच्या ताब्यात देण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून प्रांताधिकार्यांना पत्र देण्यात आले आहे. महसूल विभागाकडून पत्राला उत्तर येताच तांदूळ महसूल विभागाच्या ताब्यात दिला जाणार आहे.
रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या माहितीवरून बाजारपेठ पोलिसांनी शहरातील हिरा हॉलजवळून तांदळाच्या गोण्यांनी भरलेला ट्रक (एम.एच.19 सी.वाय.1514) सोमवार, 22 ऑगस्ट रात्री 11 वाजता पकडला. याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद देत पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेला तांदूळ हा महसूल विभागाच्या ताब्यात दिला जाणार आहे.
त्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने प्रांधिकारी यांना पत्र दिले आहे. लवकरच हा तांदूळ महसूल भागाच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणातील पसार झालेल्या तिन्ही संशयीताचा पोलिस शोध घेत असले तरी अद्यापही पोलिसांच्या हाती तिन्ही संशयीत लागलेले नाहीत. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.