मोठी बातमी : शिवसेनेचे दोन आमदार जाणार शिंदे गटात

ऑगस्ट 28, 2022 2:50 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ ऑगस्ट २०२२ । एकनाथ शिंदे यांच्या गटात शिवसेनेचे अजून काही आमदार जाऊ शकतात. याबाबत माहिती मंत्री संदिपान भूमरे यांनी दिली. संदिपान घुमरे म्हणाले कि, शिवसेनेचे अजून दोन आमदार शिंदे गटात येणार आहेत. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. पैठण येथे हा कार्यक्रम झाला.

एकीकडे ठाकरे आणि शिंदे गटातील कटुता वाढत असतांनाच मंत्री संदीपान भुमरे यांनी अजून दोन आमदार शिंदे यांच्यासोबत येणार असल्याचा दावा केला आहे. मंत्री आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसेनेतील आणखी दोन आमदार फुटतील असा दावा केला आहे. पैठण येथील कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे चर्चेला उधाण सुरू झाले आहे.

ekanth shinde uddhav thkre jpg webp

2019 आली शिवसेनेचे 55 आमदार निवडून आले होते. त्यापैकी 40 आमदार हे आता शिंदे गटामध्ये मिळाले आहेत. मात्र आता अजून दोन आमदार हे शिवसेनेच्या गटात जाणार आहेत अशी माहिती भुमरे यांनी दिली आहे. मात्र ते आमदार कोण असतील यावर कोणतीही माहिती भुमरे यांनी दिली नाही. नुकतेच कोकणातील एक आमदार शिंदे गटात जाणार असे म्हटले जाणार होते. मात्र असे झाले नाही. यामुळे आता येत्या काळात नक्की कोणते दोन आमदार शिवसेनेतून शिंदे गटात जाणार हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now