चाळीसगावला महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची बैठक; संघटनेच्या संपूर्ण मागण्या होणार पूर्ण!

ऑगस्ट 28, 2022 1:57 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेची बैठक काल शनिवारी रोजी चाळीसगावात उत्साहात पार पडली. बैठकीत संघटनेच्या संपूर्ण मागण्या पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन देण्यात आले. यावेळी बैठकीस राज्य अध्यक्ष शिवप्रसाद देवणे, राज्य उपाध्यक्ष प्रविण चिखलकर, कोअर कमिटी अध्यक्ष दिलीप सावळे, जळगाव जिल्हा अध्यक्ष सदानंद भदाणे हे होते.

jalgaon 7 1

तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते. बैठकीत कोतवाल याना चतुर्थश्रेणी देण्यात यावी, तलाठी भरती मध्ये आरक्षण, सेवानिवृत्त कोतवाल याना पेन्शन, या मागण्याचे निवेदन चाळीसगाव चे आमदार मंगेश चव्हाण यांना देण्यात आले तसेच त्यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान, आमदार यांनी कोतवाल यांचे फाईल वित्त विभागातून लवकरच मंजूर करून देतो असे आश्वासनच न देता शब्द दिला असल्याची माहीती राज्य कोतवाल संघटनेतर्फे देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now