खुनाच्या घटनेने यावल तालुका पुन्हा हादरला ; कुऱ्हाडीने वार करून महिलेची हत्त्या

ऑगस्ट 28, 2022 8:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | २७ ऑगस्ट २०२२ | जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसतेय. यावल तालुक्यातील चितोडा येथे तरुणाच्या हत्येची घटना ताजी असताना शनिवारी रात्री पुन्हा एका महिलेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. कुऱ्हाडी महिलेवर वार करून हत्या करण्यात आली.

yawal murder jpg webp

यावल शहरातील काझिपुरा भागात ही घटना समोर आलीय. नाजिया जलिल काझी (वय ३५) असे मयत महिलेचे नाव आहे. या महिलेवर कुन्हाडिने हल्ला करण्यात आला यात हि महिला गतप्राण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ येथे धाव घेवून पंचनाम्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

मात्र या घडलेल्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यावल येथील ग्रामिण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासनी करून महिलेस मृत घोषित केले आहे. यात संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकणी जावेद युनूस पटेल (वय २८ रा. यावल) या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे. काही महिन्यापूर्वीच जावेद पटेल यावर प्राणघात हल्ला करण्यात आला होता. यातून तो बचावला होता त्याला या हल्ल्यात बऱ्याच जखमा झाल्या होत्या. यातील हल्लेखोर हे मयत महिलेचे निकट असल्याचे समजते यानंतर त्याने दबा धरून नाजिया काझी यांच्चावर कुऱ्हाडीने दोन वार केल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. त्यांनतर तसेच थेट संशयित कुर्हाड हातात घेवून पोलिस स्थानकात जावून आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now